
ए..... चलती क्या ????
ए...... चलती क्या ? हा शब्द ऐकताच सामान्य स्त्री अगदी लाजिरवाणी होऊन जाते, परंतु हा शब्द ऐकून या काही स्त्रिया अगदी खुश होतात. अश्या ह्या गणिका ! पूर्वी विविध गावात कुठेतरी एखादा कुंटणखाना असायचा श्रीमंत लोक तिथे मनाचे व देहाचे चोचले पुरविण्यास जात असत. आणि आपल्या पैशांच प्रदर्शन मांडत असत. ब्रिटिश इग्रजांच्या काळात अश्या वेश्यांच्या वस्तीची स्थापना करण्यात आली ती त्यावेळेस त्यांच्या सैनिकांची गरज होती. इंग्रजांनी स्थापन केलेला ग्रँटरोड येथील फोकलेंड रोड खास वेशांसाठी बनवीला होता, अजूनही तेथील परंपरेनी वेश्या व्यवसाय करणांऱ्या जवळ वेश्या व्यवसायाचा परवाना आहे. त्याकाळी कदाचित ती गरज होती, परंन्तु आता चित्र बदललं आहे.
आजच्या विज्ञान युगात इतकी टेक्नोलॉजी पुढे गेली आहे, आणि अश्या ह्या विज्ञान युगात नोकरी मिळणं, रोजगार उपलब्ध होणं अगदी इझी झालेलं आहे. तरीही काही महिला, मुली ह्या व्यवसायात इझी मनी प्राप्त करण्यासाठी देहविक्री, वेश्या व्यवसायात सर्रास उतरतात, अंग मेहनत न करता एन्जॉय आणि पैसा दोनीही प्राप्त होते आणि आता तर 20, 22 वर्षांच्या मुली देखील वेश्या व्यवसायात सर्रास उतरतात, परंन्तु या रोगराईचे करोनाच्या काळात या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला व मुलींची लक्षणीय वाढ झाली आहे. मिळालेल्या माहिती नुसार वेश्या व्यवसाय करणाऱ्या ह्या महिला, दिवसाला दोन ते तीन हजार रुपये सहज कमवून जातात. परन्तु ह्या वेश्यांचा सुकाळ होत चाललाय. आता ह्या वेश्या बंद खोलीतुन बाहेर येऊन रस्त्यावर सर्रास जागोजागी उभ्या असलेल्या दिसतात. ह्याचेच उदाहरण आहे वसई तालुक्यातील वसई रोड वसई पश्चिमचा स्टेशन परिसर उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेला विभाग. मोठं मोठी शॉपिंग सेंटर उच्चभ्रु श्रीमंत लोकांची वस्ती असलेला हा वसई स्टेशनचा गजबजलेला परिसर आहे. स्टेशन च्या जवळ एसटी महामंडळाचा डेपो आहे, तसेच महानगरपालिका वसई विरार यांच्या स्थानिक बस सेवेचे ही अनेक थांबे आहेत. त्या थांब्यांच्या लगोलग बाजार पेठ ही आहे नेहमी गजबजलेला परिसर असतो, स्टोपवर मुली स्त्रिया बस साठी थांबलेल्या असतात, परंतु त्या विभागाची पाहणी केली असता असे निदर्शनास आले की बऱ्याच वेश्या स्टॉपवर नॉर्मल स्त्रियांच्या मध्ये उभ्या असतात. त्यामुळे बस ची वाट पहाणाऱ्या स्त्रियांना त्रास होतो, कधी कधी गिऱ्हाईक सामान्य बायकांना ही वेश्या समजुन 'ये चलती क्या? कितना लेगी ? असे विभत्सक प्रश्न विचारून त्यांची मानहानी करतात. जवळ जवळ २०० वेश्या या विभागात संध्याकाळी साडेतीन पासून रात्री साडे बारा वाजे पर्यंत वसई प्लॅटफॉर्म नो १ वसई डेपो ते ऋषिकेश हॉटेल पासून पुढे अश्या उभ्या असतात. ह्या वेश्या प्रामुख्याने नालासोपारा, विरार येथून येत असतात. तसेच हा वेश्या व्यवसाय काही एनजीओ चालवतात हे ही कळाले.
ह्याची तक्रार बातमीकार वृत्तपत्राच्या क्राईम वार्ताहर प्रीती तिवारी व संपादक अभिषेक शिंदे यांनी मीरा-भाईंदर व वसई-विरार चे पोलीस आयुक्त श्री सदानंद दाते यांच्याकडे केली असता, श्रीयुत दाते यांनी त्वरित या बाबीची दखल घेतली व वसई चे एसीपी श्री गिरीधर यांनी त्वरित एक्शन घेऊन माणिकपूर पोलीस स्टेशन इंचार्ज श्री भाऊराव अहिरे यांना फोन करून धडक कारवाईची सूचना दिली, त्यानुसार भाऊसाहेब आहिरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी बातमीकार चे संपादक श्री अभिषेक शिंदे व क्राईम वार्ताहर यांच्या सोबत तीन महिला कॉन्टेबल एक महिला नाईक एक पोलीस निरीक्षक, वाहन चालक यांना पथका सह पाठवुन स्टॉप वर उभ्या असलेल्या वेश्यांना त्वरित अटक केली.
सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त वसई विभाग श्री गिरीधर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री भाऊराव अहिरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिकपूर यांच्या नेतृत्वखाली पोलीस निरीक्षक मडके, पोलीस नाईक गोपाळे, महिला पोलीस शिपाई कविता मडके, पूनम महाले यांनी पार पाडली. ह्या छापेमारीत चार वेश्या महिलांना अटक करण्यात आली.