दिल्ली येथून पळून आलेली अल्पवयीन मुलगी वसई वाहतूक पोलिसांच्या ताब्यात !!

दिल्ली येथून पळून आलेली अल्पवयीन मुलगी वसई वाहतूक पोलिसांच्या ताब्यात !!

        दिल्ली येथून घरातून निघून आलेली अल्पवयीन मुलगी रिक्षा चालकाच्या सवेदनशीलतेमुळे पालकांच्या स्वाधीन ! 

         दिनांक २९ जानेवारी २२ रोजी सकाळी साडेसहा च्या सुमारास वसई पूर्व रेल्वे स्टेशन जवळ रिक्षा चालक श्री राजू कचरू करवाडे हे त्यांची ऑटो रिक्षा घेऊन नियमित प्रवास वाहतुक करण्यासाठी जात असताना तेथे अंदाजे १४ वर्षाच्या मुलीने हाथ दाखवून रिक्षा थांबवली. आणि  विचारले की 'मला राहण्यासाठी रुम मिळेल का'? त्या वेळेस रिक्षा चालक राजू करवडे यांनी तिचे नाव गाव विचारले असता तिने सांगितले की ती एकटी दिल्ली येथून निघून आलेली असून तिला येथील परिसराची माहिती नाही. तेव्हा रिक्षाचालकाने तिचे ओळखपत्र बघितले असता त्यांच्या लक्षात आले की सदरची मुलगी खर बोलत आहे.

         तेव्हा रिक्षा चालक यांनी वाहतूक अंमलदार राकेश लोहकरे यांच्याशी तात्काळ फोन वर संपर्क करून सदर मुली बद्धल माहिती सांगितली. सदर मुलीस पो अंमलदार लोहकरे यांनी माणिकपूर पोलीस स्टेशन ला घेऊन येण्यास सांगितले. पोलीस नामदार विकास ताकवले यांनी सदर मुलीचे नाव पत्ता खात्री करून, दिल्ली येथील साकेत पोलीस स्टेशन ला संपर्क साधला असता, सदरची मुलगी दिल्ली येथील रहिवासी असल्याचे समजले. मुलीला आईने अभ्यास करायला सांगीतला असता आईवर रागावून सदरची मुलगी ही २८ जानेवारी २२ रोजी रागाच्या भरात निघून आली आहे व त्याबाबत दिल्ली येथील साकेत पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. तेव्हा पोलीस नामदार विकास ताकवले यांनी सदर च्या मुलीच्या आईवडीलांशी संपर्क साधून त्यांची मुलगी वसई येथे मिळून असल्याचे सांगितले. सदरच्या मुलीचे आईवडील विमानाने मुंबईला आले. तदनंतर माणिकपूर पोलीस ठाण्यात समक्ष येऊन, त्यांच्या मुलीला ताब्यात घेतले. तिच्या आई वडिलांनी रिक्षा चालक राजू करवडे यांचे आभार मानले.

          सदरची मुलगी राजू करवडे यांच्या संवेदनशीलत्यामुळे तिच्या पालकांना तात्काळ मिळाली, म्हणून पोलीसांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week