
घरफोडी करणाऱ्या अज्ञात चोरट्यास ठोकल्या बेड्या !!
घरफोडी करणाऱ्या अज्ञात चोरट्यास ठोकल्या बेड्या !!
घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करुन मुद्दे माल जप्त करण्यास नवघर गुन्हे प्रकटीकरण कक्षास यश !!
दिनांक १५/१/२२ रोजी हर्ष महेश अग्रवाल वय वर्ष २३, यांच्या हर्ष स्टील इंडिया नावाच्या कंपनीच्या गाळ्याचे शटर अज्ञात चोरट्यांनी उचकटून स्टील भांडी तयार करण्याचा कच्चा माल (सर्कल) ने भरलेला १५०००/- रु किमतीचा १५०० किलोग्रॅम वजनाच्या १५ ते २० गोणी चोरीस केल्याची तक्रार हर्ष महेश अग्रवाल यांनी नवघर पोलीस ठाण्यात नोंदवली होती व त्या बाबत गुन्हा दाखल केला होता.
मीरा भाईंदर परिसरात वाढत्या घरफोडी व इतर चोरीचे वाढते प्रमाण ह्या वर आळा घालण्यासाठी वरिष्ठांनी गुन्ह्याची लवकरात लवकर उकल करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरणाचे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याचे ठिकाणावरील व इतर ठिकाणावरील सी.सी.टिव्ही कँमेऱ्याचे फुटेज पाहणी केली. गुन्ह्याच्या तपासात पडताळलेल्या सी.सी.टिव्ही केमेऱ्याच्या फुटेज मध्ये सदरचा गुन्हा दोन अनोळखी आरोपितांनी, तीन चाकी आणि दोन चाकी सायकलीचा वापर करून माल घरफोडी केल्याचे दिसून आले . सी सी टिव्ही केमेऱ्यातील फुटेज व फोटो द्वारा बातमीदारामार्फत तपास केला असता, दोन आरोपितांपैकी, अझरुद्दीन अताऊल शेख, वय चोवीस वर्ष यास अटक केली. अटक केलेल्या आरोपीकडून चोरी केलेली मालमत्ता १००℅ हस्तगत केली आहे.
सदर ची कामगिरी श्री. अमित काळे पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०१, डॉ. शशिकांत भोसले सहायक पोलीस आयुक्त नवघर विभाग, श्री. मिलिंद देसाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवघर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक प्रकाश मासाळ (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक योगेश काळे, पोलीस उप निरीक्षक संदिप ओहळ, पोलीस नामदार भूषण पाटील, पोलीस शिपाई गणेश जावळे, पोलीस शिपाई संदीप जाधव, पोलीस शिपाईबसूरज घुनावत, विनोद जाधव यांनी केली आहे.