पागल हो गया तेरे नाद मे!!!

पागल हो गया तेरे नाद मे!!!

        चंदेरी दुनियेच आकर्षण कुणाला नसते? ह्या चंदेरी दुनियेच्या आकर्षणा पायी कितीतरी मुल मुली भरकटली, काही मुलीतर फिल्म इंडस्ट्रीत काम करण्याच्या लालसेने पैसा आणि चरित्र ही गमावून बसतात आणि अशी मुलं मुली आश्वासनाला बळी पडतात, घर दार सोडून फ्लिम इंडस्ट्रीत काम करण्यासाठी देशाच्या विविध भागातून मुंबईत येत असतात व हरवून जातात, अशीच एक घटना २०१० साली घडली होती. २५/१/०२२ रोजी कृष्णचन्द्र भैरवदत्त जोशी वय वर्ष ४२, धंदा शेती, रा.ठी.पोस्ट हरतीला, तालुका जिल्हा नैनिताल, उत्तराखंड ह्याने पोलीस ठाण्यास येऊन तक्रार नोंदवली होती, की त्यांचा लहान भाऊ कंचन भैरवदत्त जोशी वय वर्ष 32 राहणार पोस्ट हरतीला, ता, जिल्हा नैनिताल, उत्तराखंड नैनिताल हा २०१० साली फ्लिम इंडस्ट्रीत काम करायचंय आहे असे सांगून मुंबई येथे आला होता. २०१५ नंतर कंचन जोशी याने कुटुंबियांना काहीही संपर्क न केल्याने तो हरवला असल्याची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदवली होती. डिसेंम्बर २०२१ रोजी कंचन याची आई लीलावती जोशी यांना एका इसमाचा ९३२६२२८६०२ ह्या मोबाईल क्रमांकावरून फोन आला व कंचन हा मुंबई येथे असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने नमूद मोबाईल क्रमांकाची अधिक माहिती मिळविली असता तो लो.टि मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याबाबतची माहिती मिळाल्याने ते पोलीस ठाण्यात मदत मागण्यास आले असल्याचे सांगितले. कृष्णचंद्र जोशी हे पोलीस ठाण्यात आल्यानंतर तेथील पोलीस ठाण्याचे अंमलदार कर्तव्यावरील पोलीस उप निरीक्षक रुपाली कदम यांनी कंचन याचा शोध घेण्याबाबत कृष्णचंद्र जोशी यांना विश्वास देऊन सदरची घटना वरिष्ठांना सांगितली, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ.देसाई यांच्या सुचनेप्रमाणे तात्काळ हरवलेल्या व्यक्तीचे शोध कक्ष याचे अंमलदार व पोलीस हवलदार घोगरे, महिला पोलीस शिपाई खाडे, यांना श्री शिवाजी बिल्डिंग, जे एस एस रोड, चिराबाजार मुंबई ०२ येथे पाठविले असता, श्री शिवाजी बिल्डिंग तसेच नमूद मोबाईल क्रमांक धारक लाला रामपुत्र भूतक राम निवासी या नावाचा इसम मिळून आला नाही. त्यानंतर वरील नमूद मोबाईल क्रमांकवर सम्पर्क केला असता मोबाईल बंद असल्याचे समजले. नंतर सदर मोबाईल क्रमांकाचा तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेऊन मो. क्र. ७३०४२२१३३७ धारकाबाबत माहिती मिळाली. सदर मोबाईल क्रमांकावर सम्पर्क केला असता, त्याचे नाव इस्राद इसाक हुक्का असे असून त्याचे हुसेनी बिल्डिंग, मौलाना आझाद रोड, मदनपुरा नागपाडा चौकी जवळ मुंबई. येथे हॉटेल असल्याचे समजले. त्यानंतर पोलीस उप निरीक्षक रुपाली कदम व पोलीस उप निरीक्षक बो. हाडे, पोलिस हवालदार घोगरे यांनी सदर ठिकाणी जाऊन हुक्का यांच्या जवळ कंचन जोशी यांची चौकशी केली असता, त्याने सांगितले की कंचन हा नोव्हेंबर २०२१ ते डिसेंम्बर २०२१ पर्यंत कामाला होता त्याच दरम्यान तो हाजीअली, माझगाव, रे रोड, शिवडी, डॉकयार्ड या ठिकाणी दर्ग्यावर जात होता व २०२१ मध्ये तो काम सोडून निघून गेला असे सांगितले. इस्राद हुक्का यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे पो.नि रुपाली कदम, पो उ नि बोहाडे पो शि. ढगे, मपोशि खाडे, पो ह घोगरे, बाविस्कर मखरे यानी नागपाडा, रे रोड, शिवडी, माझगाव हाजीअली, परिसरात कंचन याचा दिवस रात्र शोध घेत असताना ४ दिवसाच्या तपासानंतर दारुखाना म, भायखळा कसारा बसिन रोड माझगाव येथे शोध घेत असताना कंचन जोशी मिळून आला व त्याला विश्वासने पोलीस ठाण्यात घेऊन आले व त्याचा भाऊ कृष्णचंद्र जोशी याला कळविण्यात आले व कंचन यास त्यांच्या स्वाधीन करण्यात आले पोलीसांनी दाखवलेल्या कार्य तत्परते बद्धल कृष्णचंद्र जोशी यांनी पोलीस शोध पथकाचे आभार मानले. सदर ची कामगिरी पो सह आयुक्त कायदा व सुव्यवस्था मुंबई श्री विश्वास नांगरे पाटील, अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग मुंबई श्री दिलीप सावंत, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मुंबई डॉ सौरभ त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली मा सहाय्यक पोलीस आयुक्त पायधुनी विभाग मुंबई श्री समीर शेख व वरिष्ठ पोलीस निरक्षक लो. टि, मार्ग पो ठाणे मुंबई ज्योती देसाई यांच्या सहभागामुळे २०१५ पासून हरवलेला इसम कंचन जोशी यांचा शोध घेण्यास यश मिळाले, केलेल्या उत्त्कृष्ठ कामगिरी बद्धल पोलीस खात्याचे कौतुक होत आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week