दोस्त दोस्त ना रहा ! प्यार तुने क्या किया ! नवऱ्याने केला बायकोच्या प्रियकराचा खून !

दोस्त दोस्त ना रहा ! प्यार तुने क्या किया ! नवऱ्याने केला बायकोच्या प्रियकराचा खून !

       मित्राचा खून करून पळून जाणाऱ्या आरोपितास बारा तासाच्या आत अटक करण्यास वालीव गुन्हे प्रकटीकारण शाखेस यश.

        हल्लीच्या काळात व्यक्ती स्वतंत्रतेचा स्त्री पुरुष पुरेपूर फ़ायदा घेतात, त्यामधून प्रेम प्रकरण ही खूप वाढली आहेत, अशाच एका प्रेम प्रकरणातुन एका मित्राने दुसऱ्या मित्राचा खून केला, घटना अशी घडली की 

        दिनांक २८ जानेवारी २२ रोजी रात्री ९ च्या सुमारास दिनेश रमाकांत रावते वय वर्ष २७ यास स्वेटरच्या लेसच्या सहाय्याने गळा आवळून त्याचाच मित्र किरण काकड्या हिंगा याने जीवे ठार मारले. किरण काकड्या हिंगा ह्याच्यावर वालीव पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कायदानव्ये कलम ३०२ अनव्ये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्याने लागलीच वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदारांना तपासाच्या सूचना केल्या. वरिष्ठांच्या सूचनांनुसार वालीव पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदारामार्फत आरोपितास वेळ न दवडता ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

         आरोपिताकडे चौकशी केली असता असे समजले की आरोपी किरण हिंगा ह्याची पत्नी आपला नवऱ्याला सोडून त्याचा मित्र तथा मयत दिनेश रमाकांत रावते ह्याच्या जवळ मागील एक वर्षा पासून राहत होती. त्याच कारणावरून तो दिनेशवर अत्याधिक द्वेष बाळगून होता व ह्याच कारणावरून दिनांक २८ जानेवारी २२ रोजी दोघांमध्ये वाद झाला व उद्धभवलेल्या वादातून आरोपी किरण हिंगा याने आपला मित्र दिनेश रावते याचा स्वेटरच्या लेस ने गळा आवळून खून केला. स्वस्ताची अटक टाळण्यासाठी पळून जाण्याचा तयारीत असताना वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी यांनी त्याला अटक केली.

         वालीव शाखेचे अधिकारी व अंमलदार व बातमीदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळाचे सुक्ष्म निरीक्षणाच्या आधारे खुनाची यशस्वी रित्या उकल केली आहे. गुन्हा झाल्यापासून आरोपितला अवघ्या बारा तासात वालीव पोलिसांनी अटक करून प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

         वरील कामगिरी श्री संजयकुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ २ वसई, श्री. पंकज शिरसाट सहाय्यक पोलीस आयुक्त तुळींज विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वालीव ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री  कैलास बर्वे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राहुल कुमार पाटील,  पोलीस निरीक्षक (प्रशासन) श्री. मिलिंद सांबळे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस उप निरीक्षक प्रशांत चव्हाण, पोलीस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, पोलीस नामदार सचिन दोरकर, किरण म्हात्रे, राजेंद्र फड, सतीश गांगुर्डे, पोलीस अंमलदार गजानन गरीबे, सूर्यकांत मुंढे, सचिन खताळ, जयवंत खंडवी, विनायक कचरे यांनी तत्परतेने पार पाडली.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week