
आजा मेरी जान व्हाट्सअँप से ! आता वेश्या व्यवसाय व्हाट्सअँप वरून ?
आजा मेरी जान व्हाट्सअँप से ! आता वेश्या व्यवसाय व्हाट्सअँप वरून ?
व्हाट्सअपच्या माध्यमातून मुलींचे फोटो पाठवुन वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेवर कारवाई !
आजकाल मोबाईल सॉफ्टवेअर मुळे मानवाला इतक्या सुविधा घर बसल्या मिळतात की घरी बसून तुम्ही सगळी काम करू शकता. धकाधकीच्या जीवनात वेळ नसताना मोबाईल अँपमुळे अनेक कामे वेळेवर पूर्ण करता येतात. कोसो दूर असलेल्या व्यक्तीला व्हाट्सअँप मेसेंजर मुळे तुम्ही व्हिडीओ कॉल करून पाहू शकता खुशाली घेऊ शकता. इतकं इझी लाईफ मनुष्याचं झालं आहे. पण म्हणतात ना चांगल्या बरोबर वाईट ही खपल जात, असंच काहीतरी व्हाट्स अँपच आहे. चांगल्या कामाबरोबर वाईट कामासाठी ही ह्याचा सर्रास उपयोग होत आहे.
अशीच एक घटना मीरा भाईंदर परिसरात मिळून आली. दिनांक १ जानेवारी २२ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध भाईंदर पथकाचे पोलीस हवालदार उमेश पाटील यांना गुप्त बातमी द्वारा मार्फत माहिती मिळाली की मिरारोड परिसरात राहणारी महिला तनु व तिचा साथीदार मेहुल असे दोघे मिळून पुरुष गिऱ्हाईकांना व्हाट्स अँपद्वारे मुलींचे फोटो पाठवुन व चॅटिंग करून वेश्यागमनासाठी मुलींना मीरा भाईंदर परिसरातील लॉजवर पाठवतात.
मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. एस.एस.पाटील यांनी सापळा रचून बोगस गिऱ्हाईक व पंच यांना परिवार हॉटेल पुनम सागर कॉम्प्लेक्स मिरारोड स्टेशन रोड मिरारोड पूर्व या ठिकाणी पाठवून वेश्यागमनासाठी मुलीं पाठवण्यास सांगितलं, समोरच ह्या बातमीची सत्त्यता दिसून आली. पोलीस पथकासह छापा टाकला असता महिला दलाल तनु शर्मा ही वेश्यागमनाच्या मोबदल्यात पुरुष गिऱ्हाईकांना मुली पुरवत असताना रंगेहात पकडली गेली. सदर बाबत पोलीस हवालदार उमेश हरी पाटील यांनी सरकार तर्फे फिर्याद दिल्याने, आरोपी तनु शर्मा व तिचा साथीदार मेहुल राहणार काशीमीरा यांचे विरुद्ध नयानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि क्र. ४८/२०२२ भारतीय दंड विधान कलम ३७०,३४ सह अनैतिक व्यापार प्रतिबंध, कलम ४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई डॉ. श्री .महेश पाटील पोलीस उप. आयुक्त (गुन्हे), श्री.अमोल मांडवे सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संपत राव पाटील, पोलिस हवालदार उमेश पाटील, पोलीस हवालदार रामचंद्र पाटील, पोलीस शिपाई केशव शिंदे, महिला पोलीस शिपाई सुप्रिया तिवले अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष भाईंदर यांनी यशस्वी केली आहे.