
बोगस ठेव योजना राबवणाऱ्याचा पोलिसांनी केला पर्दाफाश !!
बोगस ठेव योजना राबवणाऱ्याचा पोलिसांनी केला पर्दाफाश !!
नवघर पोलिसांना माहिती प्राप्त झाली होती की मीरा भाईंदर वसई विरार पोलीस कार्यक्षेत्रातील नवघर येथे पंचरत्न को ऑ सोसा इथे रवींद्र शिवाजी जर या नावाच्या इसमाने अस्मिता इंटरप्राईजर या प्रोप्रायटर शिप च्या नावाने बेकायदेशीर रित्या ४० आठवडे मुदतीच्या बोगस गुंतवणूक योजना सुरू करून प्रत्येक गुंतवणुकीवर प्रति आठवडा ५ टक्के परतावा ४० आठवड्यात दुप्पट होईल असा प्रचार केला. तसेच एजंटला १ ते ४ टक्के अस अवाजवी अमिश दाखवुन सुरुवात १०,००० रुपये पासून पुढे कितीही करण्यात येईल, १० हजार रुपयांवर प्रति आठवडा ५ टक्के परतावा या नुसार ४० आठवड्यात २०.००० असे दुपट्ट रक्कम देण्याचे खोटे आमिष दाखवले.
सदरच्या माहितीची शहनिशा करण्यासाठी पोलीस खाजगी व्यक्ती सोबत जाऊन स्कीम ची माहिती घेतली असता समजले की त्याच्याजवळ केलेल्या ठेव पूर्तीची गुंतवणूक तो शेअर बाजार मध्ये करतो, आणि रक्कम रीतसर घेण्यासाठी आरओसी कडे नोंदणी केली असल्याचे सांगितले तसेच गुंतवणूक दार घेऊन आल्यास एजंटला २ टक्के कमिशनही मिळते हे समजले.
वरील बाब ही सत्य आहे हे समजल्यावर वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली नवघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई व त्यांचे आधिकारी यांनी सापळा रचून आरोपीच्या राहत्या घरी तसेच आरोपीचे कार्यालय येथे धाड मारली असता गुंतवणूक दारांची यादी, पावत्या, माहिती देणारे माहिती पत्रक, तसेच इतर कागदपत्रे व ११,७१,५०० रोख रक्कम प्राप्त झाली. आरोपितांकडून २,७३,६८००० इतकी ठेव बोगस ठेव रक्कम जमा करण्यात आली.
भारतीय दंड विधान कलम २१/२३ या अनव्ये शिक्षा पात्र गुन्हा दाखल करून, आरोपितास अटक करण्यात आली.
सदरची कामगिरी श्री.अमित काळे, पोलीस उप आयुक्त परी मंडळ १, पोलीस सह आयुक्त डॉ श्री. शशिकांत भोसले नवघर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई, पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक राम कदम, पोलीस उप निरीक्षक प्रसाद पाटील, सहाय्यक फौजदार खोत, पोलीस हवालदार संजय पाटील, पोलीस हवालादार अदक, पोलीस नामदार प्रशांत वाघ, पोलीस शिपाई नवनाथ मान, पोलीस नामदार राठोड, महिला पोलीस नाईक वैशाली उगले, पोलीस शिपाई आकाश वाकडे, होम शेलार, चव्हाण यांनी केली आहे.