
मोटार सायकली चोरी करणाऱ्या चोरांच्या आरे पोलिसांनी आवळल्या मुसक्या !
मोटार सायकली चोरी करणाऱ्या चोरांच्या आरे पोलिसांनी आवळल्या मुसक्या !
आजकाल मेहनत न करता इझी मनी मिळवण्यासाठी लहान वयाची मुलं चोरीचा घरफोडीच्या रस्ता वापरत आहेत. त्यात बायकांच्या गळ्यातील दागिने चोरी करणे, चारचाकी दुचाकी वाहने चोरी करून पैसा मिळवणं हा एक चोरट्यांचा धंदा होऊन बसलाय.
असाच बाईक चोरीचा गुन्हा आरे पोलिसांनी उघडकीस आणला आहे. दिनांक ३० जानेवारी २२ रोजी आरे पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक खोलम हे पथकासह गस्त घालीत असताना गुप्त माहिती दाराने माहिती दिली की रात्री इसम मयूर नगर मार्केट, आरे कॉलनी येथील ए टी एम सेंटर येथे दरोडा घालण्यासाठी येणार आहेत. त्याप्रमाणे पोलीस उप निरीक्षक खोलम यांनी सदरची माहिती वरिष्ठांना दिली. सदर गुन्हयास अंजाम देण्यासाठी सापळा रचला असता इसम (१) अलंकार विलास गुडेकर वय वर्ष २१ (२) सिबु कमल आदक उर्फ आकाश बंगाली वय वर्ष १९ वर्षे (३) कृष्णा सदानंद शुक्ला उर्फ किसन वय २२वर्ष हे मिळून आले. तसेच रोहित व रेहान नावाचे दोन इसम पळून गेले.
नमूद तीन इसमांना पोलीस ठाण्यास आणून गुन्हा रजि क्र.१८/२२ कलम ३९९,४०२ भारतीय दंड विधान सह कलम ३७(१) (अ) ३१५ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कोठडी दरम्यान अटक आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडून मुंबई, ठाणे, पालघर हद्दीतून चोरी केलेल्या एकूण १२ महागड्या मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
आरोपीने चोरी केलेल्या मोटारसायकल व उघडकीस आलेले गुन्हे
अ) आरे पोलीस ठाणे, मुंबई
गुन्हा रजि भा द वि कलम ३७९ प्रमाणे एक बजाज पल्सर, किंमत अंदाजे ५०'०००, एक बजाज अव्हेनसर किंमत अंदाजे ७०,००० रुपये
ब) जुहू पोलीस ठाणे, मुंबई
दोन मोटारसाकली एक बजाज पल्सर, १,१०,०००, एक होंडा डिओ किंमत अंदाजे ४०'०००
क) मालाड पो ठाणे
एक होंडा डिओ कि.४०,०००
ख) वालीव पोलीस ठाणे, पालघर
तीन
ग) बोरिवली पो ठाणे
तीन सायकल कि.२१०००
फ) दहिसर पो ठाणे हद्द
दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २ पल्सर २२० मोटार सायकल लॉक डाउन पूर्वी चोरी करून राहते गावी उत्तरप्रदेश येथे पाठवल्या आहेत.
काशीमीरा पो ठाणे जिल्हा ठाणे
एक काळ्या लाल रंगाची पल्सर किंमत अंदाजे १,१५०००
अटक आरोपी अलंकार विलास गुडेकर वय वर्ष २१ वनराई पोलीस ठाणे येथे ३ गुन्हे, कृष्णा सदानंद शुक्ला उर्फ किसन वय २२ ह्यावर एम आय डीसी पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हे ३, अंधेरी पोलीस ठाणे २ व मेघवाडी पो ठाणे येथे १ गुन्हा दाखल असून दोन आरोपी फरार आहेत.
सदरची कामगिरी श्री प्रवीण पडवळ अपर पो आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग मुंबई, श्री सोमनाथ घार्गे पो उपआयुक्त परिमंडळ १२ मुंबई, संजय पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त दिंडोशी विभाग, श्री वाल्मिकी पाटील प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आरे पोलीस ठाणाच्या मार्गदर्शनाखाली, पो उप निरीक्षक खोलम, पोलीस उप निरीक्षक सावंत, पोलीस नाईक बडे, पोलीस शिपाई भाबड, ढोक, शिगाणे, थोरात, पोलीस शिपाई जानराव, काटे गोडसे, चव्हाण यांनी पार पाडली.