
दोष कुणाचा ? १६ वर्ष वयाच्या मुलींचा वेश्या व्यवसाय झाला आहे शौक !
दोष कुणाचा ? १६ वर्ष वयाच्या मुलींचा वेश्या व्यवसाय झाला आहे शौक !
वेश्या व्यवसाय म्हणजे अगदी दर्या मे खस खस होत चाललंय, मग दोष कुणाचा?परिस्थितीचा का शान शौकत पूर्ण करण्यासाठी अवलंबिलेल्या अनैतिक वेश्या बनून धंदा करण्याऱ्या मुलींचा ! ह्यात तर अगदी अल्पवयीन मुली सुद्धा खुशीने जाताना दिसत आहेत. ह्यात त्यांना काही दोष वाटत नाही. आणि ह्या वेश्यांची समाजाला लागत चाललेली बुरशी आहे. गजकरण आहे. जे वाढतच चाललं आहे. महागडे मोबाईल, कपडे इतर शौक पूर्ण करण्यासाठी बायका मुली यांना वेश्या बनण्यात काहीच वावगं वाटत नाही.
अशीच एक घटना उघडकीस आली !
मानवी वाहतूक प्रतिबंध पथक नालासोपारा विभागाचे पोलीस निरीक्षक एस एस.चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालय कार्यक्षेत्रात वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक वेश्या दलाल महिला वय वर्ष ४० वर्ष रा.मुंब्रा ठाणे, ही ग्राहकांना अल्पवयीन मुली पुरवून वेश्या व्यवसाय धंदा करते व त्यावर आपली उपजीविका करते.
मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक एस.एस.चौधरी यांनी बोगस गिऱ्हाईक आणि पंच यांना मुंबई अहमदाबाद हायवे रोड वरील ससुपाडा गावाच्या हद्दीत जीएन मोटेल हॉटेल या ठिकाणी पाठवुन सत्यता पडताळून छापा टाकला. त्यावेळेस महिला दलाल सलमा शेख ही वेश्या गमनाच्या मोबदल्यात पुरुष गिऱ्हाईकांना अल्पवयीन मुली पुरवीत असताना रंगे हात सापडली.
सदर बाबीत पोलीस हवालदार निवृत्ती पद्माने ह्यांनी सरकार तर्फे फिर्याद दिली होती. त्या अनुषंगाने वेश्या दलाल सलमा शेख राहणार मुंब्रा ठाणे हिच्या विरुद्ध वालीव पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३६६(अ), ३७०,३७० (अ),(१) सह पिटा कायदा कलम ४,५ व बालकांचे लैंगिक शोषण अत्याचारापासून संरक्षण अधिनियम ४,१६,१७,१८ या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई डॉ महेश पाटील, उप आयुक्त गुन्हे, श्री.अमोल मांडवे, सहा. पो.आयुक्त गुन्हे, मि.भा. व. वि. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष सोपान चौधरी, फौजदार बारकू दगा चिते, पोलिस हवालदार राजेश निवृत्ती पद्माने, महिला पोलिस हवालदार सुनीता जॉन काटेला, रोशन किणी, पोलिस नाईक विशाल कांबळे, पोलिस नाईक महेंद्र शेटे, महिला पोलिस शिपाई काजल प्रदीप पाटील यांनी पार केली.