
सर्वस्व माझं पैसाच पैसा ! क्षुल्लक पैशांसाठी केला भावाने भावाचा खून !!
सर्वस्व माझं पैसाच पैसा ! क्षुल्लक पैशांसाठी केला भावाने भावाचा खून !!
पैसा जीवनातील सर्वात महत्वाचा, त्याच्या पुढे मग कुणी कुणाचं नसत, पैशाने नाती बांधली जातात आणि बिघडली ही जातात. पैसा कमविण्यासाठी माणूस कधी नीच पदाला जातो चांगल्या, वाईट मार्गाचा अवलंब करतो. म्हणतात मैत्री मध्ये आणि नात्या मध्ये पैशाचा व्यवहार करू नये आणि केला तर निभवावा हे सत्य अश्या ह्या पैश्या मागे माणूस वेडा आहे. आणि कधी कधी त्या पैशासमोर व्यक्तीला नातीही क्षुल्लक वाटतात, आणि कधी कधी त्याच्या ह्यातून काहीतरी वाईट घडत असतं.
अशीच एक घटना दहिसर परिसरात घडली. दिनांक ४ फेब्रुवारी २२ रोजी रात्री साडे आठच्या सुमारास ते ५ फेब्रुवारी सकाळी सहा वाजे पर्यंत आरोपिताचे त्याच्या मामेभावाला दिलेले १०० रुपये परत न केल्याने आरोपी व त्याच्या मामेभावाचे भांडण झाले होते. त्या दरम्यान आरोपिताच्या मामेभावाने आरोपिताला शिवीगाळ केली होती. हा राग आरोपीच्या मनात धुसमसत होता.
४ फेब्रुवारीच्या रात्री आरोपी इसमाने आपल्या मामेभावास नायर एसी गँरेज मध्ये धक्का मारून खाली पाडले. तसेच तेथे असलेल्या प्लास्टिकच्या दोरीने आपल्या मामेभावाचा गळा आवळून त्याला जीवे ठार मारून मृत देहावर ब्लँकेट आणि काही कपडे टाकून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादी श्री विजेंद्र वाघमारे वय ३८ वर्ष सहा पोलीस निरीक्षक यांनी हा गुन्हा उघडकीस आणला व दिल्येल्या फिर्यादी वरून गुन्हा रजि. क्र.१२७/२०२२ कलम ३०२,२०१ भारतीय दंड विधान अनव्ये आरोपितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.