
मुंबई पोलिसांची यशस्वी कामगिरी ! मुलुंड मध्ये भरदिवसा पडलेल्या सशस्त्र दरोड्याची ४८तासांत पोलिसांकडून उकल !!
मुंबई पोलिसांची यशस्वी कामगिरी ! मुलुंड मध्ये भरदिवसा पडलेल्या सशस्त्र दरोड्याची ४८तासांत पोलिसांकडून उकल !!
मुंबई पोलीस म्हटलं की शीघ्र गुन्ह्याचा तपास लावण्यात हातखंडा. मग ते गुन्हे कितीही किचकटीचे असो, मुंबई पोलिसांचे हात इतके लांब आहेत की. गुन्हेगार सुटुच शकत नाही त्यांच्या तावडीतून मग तो गुन्हा चोरीचा असो बलात्कार, मनुष्यशोध, खून, दरोडा, अतिशय वेगवान मनुष्यबळ आणि तांत्रिक यंत्रणा ह्यामुळे मुंबई पोलिसांची गणती जगात केली जाते. अश्याच एका गुन्ह्याचा छडा मुंबई पोलिसांनी ४८तासांत लावला.
दिनांक २ फेब्रुवारी २२ रोजी दुपारच्या सुमारास मुलुंड मधील पाचरस्ता या भर लोक वस्तीत व गर्दीच्या ठिकाणी असलेल्या "व्ही.पी.एंटरप्रायझेस" या ऑफिसमध्ये शस्त्रासह दरोडा टाकून ऑफिसमधील लोकांना पिस्टलचा धाक दाखवून ऑफमध्ये जमा झालेली 'सत्तर लाख' रुपयांची रोकड जबरीने चोरून घेऊन जाण्यात गुन्हेगार यशस्वी झाले होते.
सदर घटनेबाबत दरोडेखोरांनी कसलेही पुरावे मागे ठेवले नव्हते. परंतु पोलिसांनी मनुष्यबळ आणि तांत्रिक तपासाच्या आधारे दरोडेखोर यांचा येण्याचा मार्ग व जाण्याचा मार्ग याबाबत माहिती मिळवली. दरोडेखोर पांढऱ्या रंगांच्या एका मारुती इको व्हॅन एम एच ४६, बीक्यू ०२६८ मधुन घटनास्थळी आल्याचे व त्याच व्हॅन मधून पळून गेल्याची माहिती मिळाली होती. गुन्हेगारांनी अतिशय चलाकीने गुन्हेगारी शक्कल वापरून, इको व्हॅनच्या नंबर प्लेट्स वेळोवेळी बदलुन, तसेच अंगावरील कपडे बदलून वेषांतर केल्याने इको गाडीची आणि दरोडेखोरांची ओळख पटविणे पोलिसांच्या तपासाच्या दृष्टीने जिकरीचे झाले होते.
मा.पोलीस सह आयुक्त कायदा व सुव्यवस्था मुंबई अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग चेंबूर यांच्या आदेशानुसार पोलीस उपआयुक्त परिमंडळ ७ यांच्या नेतृत्वात परिमंडळ ७ व ६ मधील गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व अंमलदार यांची एकूण १२ पथके तयार करून सदर पथकांना मुंबई, नवीमुंबई, नाशिक, सातारा, रायगड या जिल्ह्यात तसेच गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यात रवाना करण्यात आले होते.
तांत्रिक तपासाच्या आधारे पांढरी इको गाडी चालक आरोपी क्र.१ ह्याला ताब्यात घेऊन खात्री केली असता समजले की आरोपी क्र १ याचा मालक व इतर साथीदार यांच्यासह त्याच्या इको गाडीत बसून मुलुंड येथे आले व एका ऑफीसवर दरोडा टाकून मोठ्या प्रमाणात रक्कम चोरून नेल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे चालक आरोपी क्रमांक १ याचा मालक आरोपी क्र.२ यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. नमुद अटक ही दोन्ही आरोपी यांनी दिलेल्या माहिती वरून गुन्ह्यात सहभागी असलेले इतर आरोपी यांना नवी मुंबई, उज्जैन, मध्यप्रदेश, सुरत गुजरात व वाराणशी उत्तरप्रदेश येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली. अटक आरोपी यांनी दिलेल्या माहिती वरून गुन्ह्याच्या घटनास्थळाची रेकी करून माहिती पुरवणारा आरोपी क्रं. ७ हा डोंबिवली जिल्हा ठाणे येथे राहत असल्याची माहिती मिळाल्यावर त्यालाही अटक करण्यात आली.
सदरचे सर्व गुन्हेगार हे मोनू नावाच्या गँगस्टरच्या नेतृत्वाखाली व अशा प्रकारचे गुन्हे करीत असलेल्या इतर जौनपुर येथील सदस्यांना सुद्धा अटक करण्यात आली. सदरच्या गुन्ह्याच्या तपासात अशी माहिती मिळून आली की, यातील गुन्ह्याच्या घटनास्थळाची रेकी करून माहिती पुरवणारा आरोपी क्र. ७ हा डोंबिवली जिल्हा ठाणे येथे राहत असून तो मुंबई, नवीमुंबई यातील ठाणे यातील ज्या ठिकाणी मोठ्या रक्कमा आहेत अश्या ठिकाणांची माहिती काढून मोनू नावाच्या गँगस्टरच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यांमधून गुन्हेगार, गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बोलवून घेऊन त्यांना शस्त्रास्त्रे पुरवून त्यांच्या कडुन अश्या प्रकारचे गुन्हे करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या गुन्ह्यामध्ये दीड महिन्यांपूर्वी, गुन्हयाच्या दोन तीन दिवस अगोदर टोळी प्रमुख मोनू याच्या नेतृत्वात गुन्ह्याच्या घटनास्थळी रेकी करून माहिती पुरवणारा आरोपी क्रमांक ७ याच्या माहिती वरून गुन्हा करण्यात यशस्वी झाला होता. सदरच्या गुन्ह्यात एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली. आरोपी १) वय वर्ष ३२ रा. पिंपळोली कर्जत २) वय वर्ष३४ रा. बदलापूर ३) वय वर्ष २४ रा. उलवे नवी मुंबई ४) वय वर्ष ३४ रा बक्सा जौनपुर उत्तर प्रदेश ५) वय वर्ष २५ रा.मच्छली, जौनपुर, उत्तर प्रदेश ६) वय वर्ष २३ वर्ष रा.सुरत गुजरात, ७) वय ४३ वर्ष, रा.निलजे, डोंबिवली पूर्व, जि ठाणे यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या कडून एकूण ३७ लाख रोकड हस्तगत करण्यात आली. एकूण ४ पिस्टल, २ कट्टे, २७ राउंड काडतुसे, दोन मँग्जीन, तीन वाहने एक इको व्हॅन २) इनोव्हा कार ३) सेलेरिओ कार आरोपीनी अंगावर बदली केलेले कपडे, गाड्यांच्या वेगवेगळ्या क्रमांकाच्या नंबर प्लेट्स इत्यादी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलिसांच्या तपासात अटक आरोपी यांची आंतर राज्य टोळी असून अटक आरोपीपैकी काही गुन्हेगार हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री हेमंत नगराळे, मा. पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था मुंबई श्री विश्वास नांगरे पाटील, मा.अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग चेंबूर. मा.संजय दराडे पोलीस उप आयुक्त परिमंडळ ७, श्री प्रशांत कदम. मा सहा पोलीस आयुक्त श्रीमती प्रिया ढाकणे, वरिष्ठ पो निरीक्षक श्री कांतिलाल कोथिंबिरे मुलुंड पो ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दिलीप धामुसणे पोलीस निरीक्षक (गुन्हे) मुलुंड पो. ठाणे, तसेच परिमंडळ ७ मधील तपास पथकातील अधिकारी सहा पो निरीक्षक कांबळे, सहा पो निरीक्षक कारंडे, स पो नि झोमन, सपोनि पाटील, सपोनि नाईक, पोलीस उप निरीक्षक मुलाणी, पो उ नि घोलप, पोउनि काळे, पोउनि शिंगटे, पोउनि सोनावणे (मुलुंड), पोउनि वाघमारे, पोउनि यादव पंतनगर, पो उ नि शेलार (घाटकोपर ), पोउनि शिंदे, पोउनि बागल (भांडुप), पोउनि सानप (नवघर) पोउनि (कांजूरमार्ग) तसेच परिमंडळ ६ मधील सहा पो निरीक्षक कदम (आर सी एफ), सपोनि काळे (शिवाजी नगर) 'पोउनि घुगे, (ट्रॉम्बे) पोउनि मोरे (मानखुर्द) तसेच पथकातील अंमलदार सपोनि भारत जाधव व मपोशि हाडवळे यांनी यशस्वी केली.