आता लेडीज डॉक्टर पुरुष पेशंटवर विश्वास ठेवतील का ?

आता लेडीज डॉक्टर पुरुष पेशंटवर विश्वास ठेवतील का ?

        डॉक्टर महिलेच्या डोक्यात हातोड्याने दुखापत करून जबरीने दागिने चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय आरोपितास अटक !

           दिनांक २३ जानेवारी २२ रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास ओम क्लिनिक मुर्धा गाव भाईंदर पश्चिम येथे गायत्री नंदलाल जयस्वाल वय ३६ वर्ष व्यवसाय डॉक्टर राहणार २०२ ए विंग विहार बिल्डिंग ६० फुटी रोड जैन मंदिर जवळ भाईंदर प. ह्या आपल्या क्लिनिक मध्ये असताना एक  अनोळखी इसम वय वर्षे ३५ ते ४० याने क्लिनिक मध्ये येऊन डॉ गायत्रीला सांगितले की मला दुबईला जायचे आहे त्या करीता मला आर. टी. पी. सी. आर. करायचा आहे. टेस्ट रजिस्ट्रेशन साठी आधार कार्ड लागेल असे सांगितले असता, उद्या आधार कार्ड घेऊन येतो असे सांगुन निघून गेला. सदर इसमाने पुन्हा येऊन फिर्यादी च्या डोक्यात हातोडा मारून दुखापत केली व मोबाईल फोन, सोन्याची चैन, अंगठी, रोख रक्कम, एटीएम कार्ड, क्रेडीटकार्ड इ. ९३,००० किमतीच्या वस्तू जबरदस्तीने घेऊन पळून गेला.


             ह्या गुन्ह्यातील घटनास्थळावरून मिळालेल्या तांत्रिक पुराव्याच्या आधारावरून सदरचा गुन्हा राशीद शकील खान वय ५२ वर्ष राहणार प्लॅट न. ७०५, ए विंग, निलमपार्क, नयानगर मिरारोड  पु. ता. जिल्हा ठाणे, मुळ रा. जमाला चाळ, रूम न.२ पठाण वाडी मालाड ईस्ट मुंबई हयाने केल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपी हा गुन्हयाची अटक चुकविण्यासाठी गोरखपुर, लखनौ, पाटना, कोलकाता, बंगाल येथे गेल्याचे निष्पन्न झाले. पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार आदेशानुसार गुन्हे शाखेचे अधिकारी यांच्या आदेशानुसार अधिकारी, अंमलदार यांच्या तपास टीम नमूद राज्यात रवाना करण्यात आल्या तेव्हा राशीद खान हा पश्चिम बंगाल येथे मिळून आला. त्याच्या जवळ विचारपूस करण्यात आल्यावर त्याने गुन्ह्याची कबलू दिली.

             ह्या पूर्वी ही आरोपीने मिरारोड येथे एका ६५ वर्षांच्या वृद्धेच्या डोक्यात हातोड्याने ६ गंभीर दुखापती करून दीड लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली. त्याबाबत मिरारोड पोलीस ठाण्यात भा द वि कलम ३९४,३४ गुन्हा दाखल असून आरोपीला दुबई येथिल गुन्ह्यात शिक्षा झाली असून हा आंतर राष्ट्रीय गुन्हेगार आहे हे सिद्ध  झाले आहे.

             सदरची कामगिरी डॉ महेश पाटील पोलीस उप आयुक्त गुन्हे व अमोल मांडवे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविराज कुराड, पोलीस निरीक्षक राहुल राख, सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास टोकले, सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय सरक, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन बेंद्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल आंबवने, पोलिस उप निरीक्षक हितेंद्र विचारे, पोलिस उप निरीक्षक कैलास सोनवणे, सहाय्यक फौजदार राजू तांबे, पोलिस हवालदार संदीप शिंदे, संजय शिंदे, पोलिस हवालदार अर्जुन जाधव, किशोर वाडीले, पोलिस हवालदार संग्राम गायकवाड, मनोज तावरे, मुस्तकींम पठाण, पोलीस  नामदार सचिन सावंत, पोलिस नामदार पुष्पेद्र थापा, पोलीस नामदार शिवाजी पाटील संतोष लांडगे, पोलीस कॉन्स्टेबल सुमित जाधव, प्रशांत विसपुते, विकास राजपूत, पोलीस शिपाई प्रवीण पवार, सर्व नेम गुन्हे प्रकटीकरण कक्ष १ मध्यवर्ती गुन्हे प्रकटी करण कक्ष यांनी केली.


          गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अविराज कुराडे गुन्हे प्रकटीकरण शाखा १ हे करीत आहेत.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week