वसई वालीव पोलिसांची यशस्वी कामगिरी ! १२ तासाच्या आत आरोपीला ठोकल्या बेड्या.

वसई वालीव पोलिसांची यशस्वी कामगिरी ! १२ तासाच्या आत आरोपीला ठोकल्या बेड्या.

        दोन वर्षां पासून करोनाच्या महामारी मुळे बेरोजगारांची भरमसाठ वाढ झाली. लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि आर्थिक स्थिती ढासळली. ह्याच दरम्यांन घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यात लक्षणीय वाढ झाली आहे. तरुण पिढी नोकरीच्या शोधात न जाता इझी मनी आणि एकसाथ खूप पैसे कमविण्याच्या नादात वाईट मार्गाचा अवलंब करीत असल्याचे दिसत आहे. आये दिन कुठेतरी चोऱ्या घरफोड्या होत आहेत आणि हे प्रमाण बेरोजगारीच्या समस्येतून निर्माण होत चालले आहे. आणि लोकांचा गेलेला कामधंदा परत मिळून देण्यास शासन ही काही पावल उचलताना दिसत नाही, म्हणून चोरी व घरफोडीच नेमक हेच कारण आहे की तरुण वर्ग ह्या वाईट मार्गाचा सर्रास अवलंब करीत आहेत. मग ह्या होणाऱ्या चोऱ्या, घरफोड्या ह्याला जबाबदार कोण ? हा प्रश्न गहन आहे. अशीच चोरीची घटना वसई तालुक्यातील वालीव येथे घडली.

             दिनांक ९ फेब्रुवारी २२ रोजी रात्री साडे दहा दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजताच्या सुमारास वसई तालुक्यातील वालीव हद्दीत फिर्यादी यांच्या गाळ्याच्या शटरच टाळ कुणी अज्ञात चोरट्यानी  कुठलातरी टणक हत्याराने तोडून त्यावाटे कंपनीत प्रवेश करुन नऊ लाख, पन्नास हजार, सातशेपन्नास रुपये किमतीचा प्लास्टिक दाना चोरून नेला. ह्या बाबत वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

              पडलेल्या दरोड्या बाबत घटनास्थळावरून तांत्रिक गोष्टीचा आधार घेत व गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्याचा तपास करून मो. यासीन सुखारी सिद्धीकी, नालासोपारा पूर्व, २) तबाराक हुसेन बशीर इंद्रिसी, नालासोपारा पूर्व, ३) मोहम्मद अजमल मो.अस्लम इद्रिसी नालासोपारा पूर्व ४) सलीम किताबुल्ला सिद्धीकी दहिसर यांना सदर गुन्ह्यात अटक करून ८,००,०००/- रुपये किमतीचा आयसर टेम्पो व एकूण १७,५०,७५०/- रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

             सदरची कामगिरी श्री. संजय कुमार पाटील पोलीस उपआयुक्त परिमंडळ २ वसई, श्री. पंकज शिरसाट सहायक पोलिस आयुक्त तुळींज विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कैलास बर्वे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री राहुलकुमार पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, पोलीस नाईक सचिन दोरकर, किरण म्हात्रे, राजेंद्र फड, सतीश गांगुर्डे, पोलीस अंमलदार गजानन गरीबे, सूर्यकांत मुंढे , सचिन खताळ, जयवंत खंडवी यांनी यशस्वीरित्या पार पाडली. 


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week