रेकी करून घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केलं जेरबंद ! विरार पोलीस ठाण्याची यशस्वी कामगिरी!

रेकी करून घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केलं जेरबंद ! विरार पोलीस ठाण्याची यशस्वी कामगिरी!

      रेकी करून व्यापाऱ्यांच्या दुकानांचे शटर तोडून घरफोडी करणारे तीन सराईत चोरट्यांना अटक करून एकूण दहा गुन्हे उघडकीस विरार पोलीस ठण्याची कामगिरी!

        लोकांचे कामधंदे सुटल्यामुळे तसेच बेरोजगारीच्या संख्येत भरमसाठ वाढ झाल्या मुळे आयेदिन कुठें ना कुठे घरफोडी होत असते. बेरोजगार, तसेच अंग मेहनत न करता इझी मनी मिळविण्यासाठी हल्ली वीस पंचविशीतील मुले सर्रास घरफोडी, दरोडा ह्या मार्गाचा अवलंब करताना दिसत आहेत. आणि हे सर्व करताना आपल्या भविष्याचा विचार न करता, चोरी करण्यास त्यांना काहीही वावग वाटत नाही, योग्य शिक्षण नाही, तूट पुंज्या पगाराची एखादी नोकरी, परंतु महागडे मोबाईल, महागड्या गाड्यांचे शौक पुरे करण्यासाठी, आणि चैनीचे जीवन जगण्यासाठी त्यांना घरफोडी हा मार्ग सोयीचा झाला आहे. अशा ह्या घरफोडीच्या घटनांना अगदी उत आला आहे.

        मागील काही महिन्यांमधे विरार पोलीस ठाण्याच्या हद्दी मधील व्यापाऱ्यांच्या दुकानांच्या बंद शटरला लावलेली टाळे रात्री दोन ते सकाळी सहा च्या दरम्यान  कुणीतरी तोडून ड्रॉव्हर मध्ये ठेवलेल्या रोख रखमेची सातत्याने चोरी केल्याचे गुन्हे  दाखल करण्यात आले होते. सदर प्रकारच्या गुन्ह्याचे घरफोडी झालेल्या ठिकाणी विरार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांनी भेट देऊन उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींच्या गुन्हे करण्याची पद्धत तांत्रिक तपास आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे, गोचारपाडा विरार पूर्व येथून तीन आरोपींना त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तपासा मध्ये दरोडा टाकलेले  आरोपी १) अब्दुल अनिस नूर मोहम्मद शेख २) दिलमोहम्मद उर्फ बाबू कुद्दुस शेख३) समीर ऊर्फ पापे बादशाह शेख वय २४ वर्ष रा. इंदिरा नगर, पाईपलाईन झोपडपट्टी, बांद्रा टर्मिनसच्या समोर, बांद्रा पूर्व, यांना अटक केली आहे.

        सदर आरोपी हे रेल्वे स्टेशन किंवा त्याच्या जवळपासच्या परिसरामध्ये स्क्रू ड्रायव्हर आणि कटावणीच्या सहाय्याने दुकानांच्या शटरचे कडी कोयंडा उचकटून त्यामध्ये असलेली रोख रकमेची चोरी करण्याकरीता दिवसाच्या वेळी रेकी करून रात्रीच्या वेळी चोरी करणे अश्या प्रकारे चोरी करण्याची पद्धत वापरत असल्याचे निष्पन्न झाले असून सदर आरोपितांनकडुन खालील प्रकारचे गुन्हे उघडकीस आले आहेत. 

        विरार पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ४५४,४५७, ३८० सहा गुन्हे दाखल, नवघर पोलीस ठाण्यात एक गुन्हा, कस्तुरबा पोलीस ठाण्यात एक गुन्हा ,तसेच कांदिवली पोलीस ठाणे एक गुन्हा व वांद्रे पोलीस ठाणे येथे एक गुन्हा अशा दहा गुन्ह्याची वरील कलमा प्रणाने नोंद आहे.

अनु क्र.१ ते ७ मिराभाईंदर,वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस ठाणे व अनु क्र. ८ ते १० बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी व इतर चोरीचे सुमारे ७० गुन्हे वरील आरोपितांवर दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

         सदरची कामगिरी श्री.प्रशांत वाघुंडे पोलीस उप आयुक्त, श्री. रामचंद्र देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. सुरेश वराडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. दिलीप राख पोलीस निरीक्षक (गुन्हे) गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उप निरीक्षक अभिजीत भुपेंद्र टेलर, संदेश राणे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, पोलीस नाईक, हर्षद चव्हाण, संदिप शेरमाळे, पोलीस शिपाई इंद्रनील पाटील, विशाल लोहार. रवी वानखेडे, सुनील पाटील, युवराज वाघमोडे आणि सागर घुगरकर यांनी ह्या शोध घेण्यास कसब लागणाऱ्या गुन्ह्याची उकल यशस्वी करून कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

        


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week