
'दम, मारो दम'! 'एमडी (मेफेड्रोन)' या अंमली पदार्थांची विक्री करणारा गर्दुला आरोपी गेला बाराच्या भावात !
'दम, मारो दम'! 'एमडी (मेफेड्रोन)' या अंमली पदार्थांची विक्री करणारा गर्दुला आरोपी गेला बाराच्या भावात !
अलीकडच्या काळात अंमली पदार्थांचे व्यसन हे सर्व देशासाठी भयंकर समस्येचं कारण बनलं आहे. आजची तरुण पिढी ही मद्यधुंद होताना दिसत आहे. हे कोणत्याही देशासाठी योग्य लक्षण नाही. सुमारे २३४ दशलक्ष लोक अंमली पदार्थाचे सेवन करतात. तर सुमारे दोन लाख लोक अंमली पदार्था मुळे आपला जीव गमावतात. पण तरीही त्याचा वापर केला जातो. ही खूप गंभीर बाब आहे. ज्या मादक पदार्थाच्या सेवनाने माणसाला विशिष्ट प्रकारची सुस्ती धुंदी येते, सुख भ्रमाची अवस्था देते, चिंता ताण कमी होतो, झोप लागते ह्या मादक पदार्थात झोपेच्या गोळ्यांचा ही समावेश होतो पण हेच मादक पदार्थ अति सेवन केल्याने मृत्य ओढवतो. आणि अगदी १९,२० वर्षाची मुलं, मुली मादक पदार्थांचे सेवन करण्यात अधिकच अग्रगण्य आहेत.
हेरॉईन, कोकेन, अफू (मार्फीन) गांजा, भांग, चरस मेफेड्रोन (एमडी) असे कितीतरी अंमली पदार्थ लाखों रुपये खर्च करून खरेदी करतात, मादक पदार्थांचा अधिकृत वापर फक्त वैधेकीय चिकित्सा करण्यासाठी करण्यात येतो, मग हा बाहेर विक्री करण्या करता येतो कुठून हे ही विचार करण्यास भाग पाडत. तरीही त्याचा वापर नशा म्हणून सर्रास होताना दिसत आहे.
असाच मेफेड्रॉन (एमडी) हा क्रिस्टल अथवा गोळीच्या स्वरूपात येणारा मादक पदार्थ कोकेन सारखी नशा देतो. असा हा मेफेड्रोन हा मादक अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमास घाटकोपर पोलीस ठाण्याने अटक केली. दिनांक १९ फेब्रुवारी २२ रोजी घाटकोपर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण पिसाळ व निगराणी पथक हे पोलीस ठाणे हद्दीत सतर्कपणे गस्त घालीत असताना, संशयावरून एका इसमास ताब्यात घेण्यात आले. सदर इसमाकडुन एकूण २५० ग्रॅम 'एमडी' (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ अंदाजे पंचवीस लाख रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. सदर इसमाविरुद्ध घाटकोपर पोलीस ठाणे विशेष गुन्हा कलम ८(क) सह २२ (क) एन.डी.पी.एस. कायद्यानव्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे. ह्या गुन्ह्यात पोलिसांना काही हवे असलेले आरोपींची नावे निष्पन्न झाली असुन अधिक तपास घाटकोपर पोलीस ठाण्याचे अंमली पदार्थ विरोधी विशेष पथक करीत आहेत.
सदरची कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त श्री संजय दराडे, मा.पोलीस उप आयुक्त परि मंडळ ७ मुंबई श्री प्रशांत कदम, सह्ययक पोलीस आयुक्त श्री. आंनद नेर्लेकर यांच्या मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर, पोलीस निरीक्षक अशोक पारधी, पोलीस निरीक्षक प्रमोद कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक किरणं पिसाळ, मोहन जगदाळे, राहुल मोकाटे तसेच पथकतील अंमलदार सहा.फौजदार धुमाळ, पोलीस नाईक घेवडे, देशमुख कोयंडे, पोलीस शिपाई योगेश पाटील, कुलदीप सुरवडे, यांनी केली आहे.