अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक !!

अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक !!

         अक्षयतृतीया हा हिंदु धर्मातील साडेतीन मुहुर्ततातील एक मुहूर्त आहे. वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षयतृतीया येते. अक्षयततुतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त !  चैत्र पाडवा, अश्विन शुद्ध विजयादशमी, कार्तिक प्रतिपदा म्हणजे बली प्रतिपदा, हे तीन पूर्ण मुहूर्त आणि वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षयतृतीया अर्धा मुहूर्त मानला गेला आहे.

        त्यातल्या त्यात अक्षयतृतीया ह्या मुहूर्तला अधिक महत्व आहे. अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारे ! कृष्णाने युधिष्ठीरला असे सांगितले होते की या तिथीस केलेले   हवन, देव आणि पितर यांना उद्देशुन जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय (अविनाशी) होते. अक्षय तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे सांगितले जाते. जोतिष शास्त्रात कृत, त्रेता, द्वापार आणि कलयुगाची सर्व वर्ष मिळून होणाऱ्या काळाला 'महायुग' म्हणतात. ही चार युगे महायुगाचे चार चरण असल्याचे मानले जाते. ब्रम्हदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ तो कल्पादी तसेच त्रेता युगाचा (१२,९६.००० सौर वर्षाचा काळ म्हणजे युगादी ही तिथी वैशाख तृतीयेला येते. या दिवशी गंगेच पृथ्वीवर अवतरण झालं अशीही आख्यायिका प्रचलित आहे आणि ह्या दिवशी जो मनुष्य गंगा स्नान करेल तो पापातून मुक्त होतो अशी भारतीय संस्कृतीत धारणा आहे. परशुराम भगवान चिरंजीवी आहेत ह्याच दिवशी परशुराम भगवान यांचे अवतरण झाले.

         या दिवशी भगवान व्यास यांनी  महाभारत ग्रंथाची रचना करण्यास प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणुन गणपतीने काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे. ह्या दिवशी विष्णू लक्ष्मी ची पूजा करतात उपवास करतात. चैत्र गौरी च्या हळदी कुंकवाची सांगता ह्या दिवशी करतात. जर चैत्रातील हळदी कुंकू राहून गेले असेल तर ह्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू ला बायकांना घरी बोलवून मोगऱ्याची फुले भिजवलेले हरभरे, अंब्याचं टाळ, आणि पन्हे देतात.

         अक्षयतृतीया ही तिथी खुपच शुभ मानली गेली आहे. ह्या दिवशी विवाह मुंज गृहप्रवेश सारखी शुभ कार्य करायची असतील तर वेगळा मुहूर्त काढण्याची गरज भासत नाही. ह्या दिवशी काहीजण घरात पूजा होम, जप आधी विधी करतात अक्षयतृतीयेस पितरांना केलेलं पिंडदान विशेष फलदायी असत. ह्या शिवाय अक्षयतृतीयाला नवे कपडे, दागिने, घर, वाहन आदी गोष्टी खरेदी करणं शुभ मानलं जातं. ह्या दिवशी धर्मिक कार्यक्रमाच आयोजनही केलं जातं.

        असा हा अक्षयतृतीया चा मुहूर्त तुम्हा आंम्हाला सुख समृद्धी देवो....

                                    प्रीती तिवारी


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week