दिप अमावस्या, म्हणजे गटारी नाही !!

दिप अमावस्या, म्हणजे गटारी नाही !!

     आज आषाढ महिन्यातील अमावस्या म्हणजे दिप अमावस्या, ह्या वेळेस दिप अमावस्या दिनांक २८ जुलै रोजी आली आहे व ११ वाजून २४ पर्यंत दिप अमावास्या आहे. मित्रहो ही पवित्र दिप अमावस्येला दिव्यांची पूजा केली जाते, घरातील कंदील, निरांजन समई आदल्या दिवशी स्वछ करून दिप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी सर्व दिवे पाटावर मांडून प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते, पाटाभोवती रांगोळी काढून दिव्यांची पूजा केली जाते देवा जवळ कणकेचा दिवा लावला जातो घरातील लहान मुलगा कुलदीपक व लहान मुलगी पणती म्हणून त्यांचे औक्षण केले जाते. ह्या दिवशी दिव्यांना पुरणाचे दिंडे बनवुन त्याचा नैवेध अर्पण केला जातो. 

     पूर्वीच्या काळी आधुनिक दिवे नव्हते त्यावेळेस घरात कंदिल, समई, मातीच्या पणत्या लावल्या जात पावसाळ्यात अंधाराचे दिवस असतात आणि पावसाळ्या पासून हळू हळू दिवस लहान होत जातो. अमावस्येला जास्त अंधार असतो, मग अशावेळी दिवे स्वछ घासून प्रज्वलित केले जात असत.   आपल्याला अंधारात प्रकाश देणाऱ्या दिव्या बद्दल मनात आदर भक्ती कृतज्ञता बाळगून आषाढ अमावस्येला दिप पूजन करत. 

     संध्याकाळी सर्व दिवे पाटावर ठेऊन प्रज्वलित करावे पूजा करून नैवेध दाखवावा व दिव्या जवळ हात जोडून प्रार्थना करावी "हे दिप तू सूर्य रूप अग्नी रूप समान आहेस आमच्या जीवनातला अंधकार दूर कर, आमच्या ईच्छा पूर्ण कर, घरात लक्ष्मी नांदू दे" अशी हात जोडून दिव्याला प्रार्थना करावी.

            दिप अमावस्या म्हणजे गटारी नाही कष्टहरी, गतहारी आमावस्या या शस्ब्दचा अपभ्रंश करून 'गटारी' आमावस्या हा शब्द प्रचलित झाला. मांसाहार करून दारू पिऊन गटारात लोळणे, अशी चुकीची ओळख आपण आपल्या संस्कृतीची करून देतो.

         दिप अमावस्या म्हणजे गटारी नाही, तर तो दिव्यांच्या सन्मानार्थ साजरा करण्यात येणारा पवित्र सण आहे. ही माहिती सर्व लोकांना  समजावून सांगून आपली संस्कृती पटवून दिली पाहिजे.

            मागच्या सर्व चुकीच्या गोष्टी, चुकीचा आहार सोडून नवीन विचारांची सुरवात असा त्या मागचा हेतू आहे.

दिप अमावस्येच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा !


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week