मुंबईतील के इ एम हॉस्पिटलचे नाव बदलू नये.

मुंबईतील के इ एम हॉस्पिटलचे नाव बदलू नये.

       के इ एम रुग्णालयाचे नाव बदलणे हे मंजूर झाले असले तरी, त्याची स्थापना १९२६ रोजी झाली असून त्याला एक ऐतिहासिक वारसा लाभला आहे.

        देशभरातून सर्व सामान्य नागरिक पासून श्रीमंत लोकं ही रुग्णालयाचा लाभ घेत आहेत. मोठमोठ्या शस्त्रक्रियेद्वारे रुग्ण आजारापासून मुक्त होत आहेत. वैद्यकीय सेवा बरोबर, वैद्यकीय महाविद्यालय ही या ठिकाणी आहे. याइथे मोठमोठे डॉक्टर तयार झाले आहेत.


      अशा रुग्णालयात काही गैरसोयी असतील त्या दूर करणे महत्त्वाचे आहे. डॉक्टर, कर्मचारी कमी आहेत ते दूर करणे महत्त्वाचे आहे. रुग्णालयाचे नाव बदलण्यापेक्षा समस्या दूर होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सरकार व बृहन्मुंबई महानगरपालिका कधी लक्ष देणार असा सवाल सामाजिक कार्यकर्ते व नागरिक विचारत आहेत.

विजय कदम (लोअरपरळ)


Batmikar
वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम