
पॅनकार्ड क्लब ठेवीदारांचे पैसे मिळावेत !!
देश भरातील २१ सहकारी बँक ठेवीदारांना ५ लाख रु पर्यंत रक्कम परत करण्याचा निर्णय डी आय सी जी ने घेतला आहे. हा रिझर्व्ह बँकेने घेतलेला निर्णय ठेवीदारांसाठी मोठा दिलासा असून, बँकांनी २९ डिसेंबर २०२१ पर्यंत ठेवीवरील व्याजासह विमा भरपाई रक्कम द्यावयाची आहे. असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
तरी आता पॅनकार्ड क्लब लि आरोग्य विमा, रिसॉर्ट वर मोफत राहण्याची सोय, अशा भुरळ घालणाऱ्या ई योजने मध्ये ५१ लाख गुंतवणूकदारांचे ७ हजार ३५ कोटी रुपये जमा असून, ठेवीदारांची मुदत व रक्कम, हफ्ते, मिळणारा मासिक परतावा डिसेंबर २०१५ पासून बंद झालेला आहे. अशी फसवणूक झाली असल्यामुळे सेबी तर्फे पॅनकार्ड क्लबच्या ६८ मालमत्तेपैकी १५ चा लिलाव करण्यात आला. पॅनकार्ड क्लबचा ७ हजार ३५ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून, हया संबंधी युतीच्या राज्यात विधान परिषद मध्ये मार्च २०१८ रोजी पॅनकार्ड क्लब लि ग्राहक घोटाळा संबंधी एका लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना तत्कालीन मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांनी सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळतील असे उत्तर दिले आहे. वास्तविक न्यायालयाने डिसेंबर २०१७ मध्ये ग्राहकांचे, गुंतवणूकदारांचे, पैसे ९० दिवसात परत द्यावे असा निर्णय दिला आहे. तरी मागिल ६ वर्षे गुंतवणूकदारांचे लाखो रुपये अडकून आहेत. तरी देशभरातील २१ सहकारी बँकेच्या ठेवीदारांना पैस मिळाले. तरी आता पॅनकार्ड क्लब ग्राहकांना ही दिलासा मिळावा.