
महागाई विरोधात महिला गप्प का ?
आजच्या महागाईच्या काळात सर्व सामान्य जनतेला झळ लागतच आहे. महिलांना त्याची तिव्रता जास्त भोगावी लागत आहे. त्याचप्रमाणे महिलांवरील अन्याय, अत्याचार होत आहेत. अशा महागाईच्या परिस्तिथीत सिलेंडर चे भाव हजार रु कधी होतील सांगता येत नाही. विरोधी पक्षही आवाज उठवत नाही. पूर्वीच्या महिला नेत्या मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, प्रमिला दंडवते, कमल देसाई इ नेत्या मुंबईच्या रस्त्यांवर येऊन लाटणे, थाळी मोर्चे काढून सरकारला सळो कि पळो करत असत. त्यामुळे सरकार ही ठिकाणावर येत असे. परंतु आताच्या महिला नेत्या दूरदर्शनवरील चर्चात्मक कार्यक्रमामध्ये आवाज काढून सहभागी होण्यापुरताच आहेत का ? कोणतेही सरकार असुदे, महिलांनी महागाई विरुद्ध आवाज उठवायला हवा.