
सूर्यकिरण शलाका
सूर्यकिरण शलाका
पाहिलीये कधी, एखादी #शलाका..?
अंधारात छोट्याश्या छिद्रातून रामबाणासम, तो तम चिरत,
प्रकाश पसरवण्याची कितीतरी मोठी ताकद असते तिच्यात...
कितीही अंधार खोलीभर पसरलेला असला तरी, फक्त एका त्या शलाकेने त्याचे महत्व तसूभर ही उरता दिसत नाही..!!
त्या पूर्ण अंधाराला व्यापून टाकण्याची क्षमता फक्त त्या इवल्याश्या किरणशलाकेत असते..!!
अशीच काही माणसे ही असतात...
अगदीच त्या #सूर्यकिरणशलाके सारखे,
पण अत्यंत दुर्मिळ,
प्रत्येकाला भेटतीलच, दिसतीलच असे मुळातच नाही..!!
पण जर असतील तर, ते ही एखादया कमळपानावरील पाण्याच्या थेंबा सारखे, अगदीच मनस्वी...
कितीतरी सुंदर, पण त्यांना छेडलं की, गायब होणारे..!!
त्यांना तळहाताच्या फोडासारखं जपावं लागत,
ना मुठीत बंद करता येत, ना तसच मोकळं ठेवता येत..!!
जोवर तुमचे तोवर,
कर्णाचे कवचकुंडल बनून तुम्हाला तुमच्या भावनिक अंधारापासून कायमच वाचवतील,
पण बिघडले तर,
अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राप्रमाणे, तुमच्या आयुष्याचा जणू उत्तरेचा गर्भ करतील..
बस त्यांना कर्ण म्हणून जपायचं की,
अश्वत्थामा म्हणून शाप द्यायचा हे ज्याचे त्याने ठरवावे लागते..!!
एडमं वारलोक
#सहजच
#इनफ्रेम
प्रीती तिवारी