व्हर्जिन बायको पाहिजे !!

व्हर्जिन बायको पाहिजे !!

        न्यूज पेपर मधल्या विवाह विषयक जाहिराती मध्ये मुलगी व्हर्जिन असावी ही अट सर्रास लिहिली जाते. साला आई. टी. आय, आय.आय.एम शिक्षण झालेल्या मुलांच्या ही ह्या अपेक्षा असतात. समाज म्हणून अजुन किती किळसवाण्या पातळीवर आपण आहोत; ह्याच खूप दुःख वाटते, आणि संताप होतो.

         अनेक समाजात मुलींना लग्ना आधीं कौमार्य चाचणीला सामोरे जावे लागते. अनेक हायप्रोफाईल आणि उच्च शिक्षत घरात तर रीतसर डॉक्टरांकडे जाऊन लग्नाआधीं  मुलींनीची व्हर्जिनिटी टेस्ट (चाचणी) करून घेतात. नवरा म्हणून  आपल्यालाच वमन करण्याचा प्रथम हक्क असावा ! हा विकृत 'patriarchy' चा भाग आहे. आणि मुलांच्या व्हर्जिनिटीच काय? ती कशी ओळखावी ह्याच्या विषयी काहीही देणंघेणं नाही. even मुलीच्या घरच्यांना ही नाही मग हा मूर्खपणा मुलींवरच का लादण्यात यावा.

          लग्नाच्या खरेदीत पहिल्या रात्रीसाठी व्हाईट बेडशीट ची खरेदी करतात. सिनेमातही हे सर्रास दाखवलं जात. मग दुसऱ्या दिवशी घरातल्या म्हाताऱ्या बायका ते बेडशीट चेक करणार , "गीता गोविंदम" सारख्या दाक्षिणात्य चित्रपटात ही हे दाखवलंय ते ! (लग्नाची खरेदी करताना व्हाईट बेडशीट घेत असतात. आणि  रक्ताचे डाग पाहून मुलगी व्हर्जिन होती का हा शिक्का मोर्तब करणार काय ? किती नीच प्रकार आहे हा !

           घरकाम, सायकलींग, व्यायाम असल्या अनेक गोष्टीमुळे hymen ब्रेक होऊ शकते.

       आपल्या होणाऱ्या बायकोची व्हर्जिनिटी, तिची लग्नाआधीची sex life ह्या गोष्टीबद्धल भारतीय पोरांमध्ये प्रचंड मोठा taboo आहे.

            पोरांनो!

            Virginity is not dignity even it was nothing to do with character.

            Accet and respect her past life cause she is gonna spend all her present and future with you.

"Get out of this taboo"!

That's it!

ऑरगॅनिक झुक्या .

 


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week