शृंगारीक, चारोळ्या !!

शृंगारीक, चारोळ्या !!

चारोळ्या

 शृंगारीक...

विसरूनिया दुनिया दारी,

तुझं आणि तुझंच व्हावं

मिठीत तर असेलच पण

बंधनात ओठांच्या राहावं

तुझ्या शब्दांने मी मोहरून जावे

तुझा स्पर्श होता

 या फुलाने 

बहरून यावे


मला वाटते की तुझ्या

हातातले फुल व्हावे 

तुझ्या सुगंधानेच मी

आणखी सुगंधी व्हावे,,


साठवाया मनात बहरला किती

गुलाब कळू दे जरा,

भावनाही मनातल्या,

ओठांवर गुलाबी येऊ दे जरा..


तुझ्या ओठांची तुलना करताच

गुलाबी पाकळ्या  चक्क लाजतात,

दुराव्याचे  एक एक क्षण मग

काटेरी कुंपण भासतात...


स्पर्श हळव्याओठांचा

तुझ्या गालावर जेव्हा होई

या गुलाबी थंडीत खरी ऊब

तुझ्या मिठीतच येई.....


चुंबलेल्या ओठांचा स्वाद

रसाळत राहूदे 

तुझ्या मिठीचा लाघवी स्पर्शाने मला

विरघळत राहूदे......


                       प्रीती!!! 




Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week