
बाप....
!!.बाप.!!
एकदा बाप आठवून पहा
तुला देवचं दिसेल !!
त्याच्या कष्टा शिवाय तुझं अस्तित्व
काहीच नसेल !!
तो आपल्याच घरात
खूप कमी असतो !!
आपण घरात सुखात रहावं
म्हणून तो वनवन फिरतो !!
बाप हा बाप च असतो
सर्वांन समोर खूप कमी बोलतो !!
झाली कधी असह्य वेदना तर
एकांतात जाऊन मुक्याने रडतो !!
बापाचे अश्रू आपल्याला
कधीच नाही दिसत !!
आणि जेव्हा दिसतील तेव्हा खरचं तो
मनातून असतो तुटत !!
बापाच्या कपड्यांची ही लाज
येते कधी मुलाला !!
मुलांच्या कपड्यांन साठी त्यानं खुपदा
मारलं स्वतःच्या मनाला !!
असा कसा बापच असतो
त्याला सर्वांचं मन कळत !!
दूर असलेल्या मुलींच्याही
डोळ्यातलं पाणी दिसत !!
मुलींसाठी तर तो
साऱ्या जगाशी लढतो !!
हृदयाचा पहिला ठोका त्याच्या
तिचा साठीच पडतो !!
उगाच वारी करून तु पंढरीला
देव पाहायला गेला !!
जिवंत देव घरात असून
त्याला नमस्कार नाही केला !!
कितीही उशीर होवो
मुलाला घरी यायला !!
बाप जागाच असतो
झोप येत नाही कासावीस डोळ्याला !!
मला मारून त्याला ही वाईट वाटत
हे पाहिलंय मी खुपदा !!
मध्यरात्री जवळ घेतो
ओल्या करून डोळ्यांच्या कडा !!
असा कसा रे बाप
कधी सुखाच्या क्षणी नसतो!!
पण आम्ही सुखात जगायचं
अदृश्य कारण तोच असतो !!
खरचं बाप खुपदा
कळत नाही कोणाला !!
जेव्हा तो निघून जातो
वाटते वालीच जणू गेला !!
किती लिहू बाप या व्यक्ती साठी !!
खरचं जगातली शाई अपुरी
तुझ्या स्तुती साठी!!
...राहुल लोखंडे
सातारा