
मी प्रेम केलं.....
मी प्रेम केलं तुझ्यावर
इवल्याशा फुलपाखरा मागे धावणाऱ्या
तुझ्या हळव्या मनावर
तुझ्या सोबत घालवलेल्या
प्रत्येक क्षणांवर.
मी प्रेम केलं
दुःखातही हसणाऱ्या तुझ्या स्वभावावर
माझी वाट पाहताना बेचैन झालेल्या तुझ्या नजरेवर
मी प्रेम केलं
तुझ्या प्रत्येक शब्दांवर
तू दिलेल्या वचनांवर
आणि तितक्याच तू
जपलेल्या विश्वासावर
मी प्रेम केलं
तुझ्या मंजुळ बोलण्यावर
तुझ्या त्या काळ्याभोर डोळ्यांवर
अचानक आलेल्या पावसात भिजताना तू माझ्या डोक्यावर धरलेल्या तुझ्या त्या ओढणीवर
मी प्रेम केलं
कोज्यागिरीच्या चंद्रा सारख्या
दिसणाऱ्या तुझ्या रूपावर
मला बोलवताना तू मारलेल्या मंजुळ हाकेवर
मि फुल माळल्यावर लाजून चूर
झालेल्या तुझ्या नजरेवर
मी प्रेम केलं
माझ्या पासून सुरू झालेल्या
तुझा श्वासावर
आणि तुझ्या पर्यंतच संपणाऱ्या
माझ्या आयुष्यावर
माझ्या जखमांवर वाहणाऱ्या तुझ्या अश्रूंवर
मी प्रेम केलं
तुझ्या पर्यंत पोहोचवणाऱ्या
त्या वाटेवर
भेटताच भिडलेल्या
खोल नजरेवर
आणि हृदया पर्यंत पोहोचणाऱ्या
गंधाळलेल्या प्रीती वर
मी फक्त प्रेम केलं
निस्वार्थी मनानं तिच्यावर
आणि तीने सुध्दा,
फक्त प्रेम केल...
राहुल लोखंडे सातारा