
पदर !!
मार्गशीर्ष गुरुवार
ड्रेस वरची ओढणी कितीही असो सुंदर...
भाव खाऊन जातो मात्र साडीचाच पदर...
टॉप आणि जीन्स ला कितीही असो वाव ...
पैठणीच्या पदरावरचा मोर खाऊन जातो भाव...
वेस्टर्न कपड्यांना नसतो साडी सारखा मान...
पदर बघा डोईवर कसा दिमाखात विराजमान...
काय सांगू ह्या पदराचा महिमा असे आगळा...
पदराच्या पण अंगी असतात का नाना कळा...
रागाने घेतला जातो कंबरेला खोचून...
लाजेने पडतो बघा कसा बोटांशी गुंतून...
वात्सल्याने घेतो बाळाला झाकून...
मोठ्यांना करतो नमस्कार वाकून...
मायाळू होऊन येतो अश्रूंना पुसून...
थकलेल्या धन्याचे घेतो स्वेदबिंदू टिपून..
एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर सहज घेतला जातो हातात.....
"प्रिय" च्या समोर मात्र, पदराचे टोक लाजून नकळत येते दातात....
_✍️ध्रुव