इतक्यात तू....
इतक्यातच तू.... !
इतक्यातच
तुझी माझी ओळख झालेली..
इतक्यातच तू
माझी मैत्री स्विकारलेली .
इतक्यातच का तुला
अतुरता लागलेली..
इतक्यातच तू माझी
वाट पहात असलेली.
इतक्यातच कसे ग
योग्य तुझं व्यक्त होणं
इतक्यातच ठरलेलं..
तुझं माझी मैत्री स्विकारणं.
इतक्यातच तू म्हणशील
मला तू खूssप आवडतोस
इतक्यातच तू म्हणतेयस
माझ्या विचारात तू सदैव असतोस .
इतक्यातच तुझं
माझ्यावर प्रेम जडलेलं असेल
इतक्यातच मला ते,
स्विकारावं ही लागेल.
इतक्यातच तुला कळणार नाही .
इतक्यातच प्रेमात कुणाच्या पडणं
एवढं सोप्पं नाही..!
इतक्यातच माझे सांगणे ,
आवर स्वतः ला..
इतक्यातच घाई नकोय
स्वप्नात मला पहायला.
इतक्यातच जाहिर करु नकोस
तुझी अतुरता..
इतक्यातच कशी सांगू मी ,
माझी विवशता.
इतक्यातच सांगतोय,
अशीच मैत्री असू दे..
इतक्यातच तू मला
स्विकारण्याची संधी तर दे. . . . !!
- - - - - - - - - - - - - - - - प्रद्युम्न..