चोरलीस भाकर तू..... गझल
चोरलीस भाकर तू लाडक्या मुलासाठी
कोणती सजा देऊ या तुझ्या गुन्ह्यासाठी
होलपट कुणाचीही संपली कधी नाही
वेळ ठेव राखूनी वेगळी स्वतःसाठी
सोडली जगाने जी वंदता भुलाव्याला
केवढा गुन्हा केला गुप्तशा धनासाठी
थेंब ना कुठे रानी वाळला चिमणचारा
दूर पांगले पक्षी थांबलो कुणासाठी
खेळण्यात हा रमतो गायनात तो रमतो
केवढे छळे यांना बाप हे गुणासाठी
पाच साल सरल्यावर उगवलाय धुमकेतू
राजरोस राबवतो यंत्रणा मतासाठी
भेटलीस तेव्हा तू सावलीस मागितले
सोडतेस आता का तख्त हे उन्हासाठी
बबन धुमाळ, मो नं 9284846393
Batmikar
बातमीकार
मनःशांती ते मनशक्ती !!
Mar 10, 2021
एकटेपणा !!
Jul 05, 2024
स्वप्न बहरून यावे.....
Jul 08, 2021
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी खरच...
Feb 09, 2021
मरणाची स्वारी !!
Jun 23, 2021
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस...
Jan 02, 2022
प्रेम आणि आकर्षण .....
Jun 15, 2024
विठुचा मी वारकरी.....
Jul 17, 2024
कातरवेळी
May 18, 2024
जे मला होते अपेक्षित !!
Aug 03, 2024
Related News
एकटेपणा !!
Jul 05, 2024
-
स्वप्न बहरून यावे.....
Jul 08, 2021
-
II साया II
Jan 22, 2020
-
तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू...
Jan 27, 2022
-
कधी वाटते व्हावे !!
Jun 10, 2022
-
!! जीवनाच्या वाटेवर !!
Jan 26, 2020
-
ओठ !
Jul 19, 2021
-
अश्क
Jan 15, 2020
-