
तिरडी !!
रस्त्याने चालताना आज
पहिली मी एक सजलेली
तिरडी
कुणाची तरी हक्काच्या घरी
स्वर्गात जायची तयारी..
किती झिजला होता देह सारा
गरजा पूर्ण करता कर्माच्या
आज जाऊन कुठे देह
शांत झोपला होता त्याचा..
किती रुसवे फुगवे,
भांडण, द्वेष, दुरावा सर्वच
असेल कितींशी..
पण आज सगळेच
जमले होते त्याच्या अंत्ययात्रेसाठी!
डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते
ज्यांना जाण होती, त्यांचे
वाहत होते
आता ना कुणाची मोह माया
ना कुणाच्या प्रेमाचा भुकेला
जाऊनी सर्व शांत झाले
होते आता
मुकले त्याच्याच प्रेमाला
सर्व आता
नकोच कुणाशी हेवेदावे!
प्रेमाने मिळुनी राहवे!
बघता प्रेताची आखरी
निरोपाची तयारी
का वाटले माझीच अंतिम तयारी
पाहता विचाराने डोळे पाणावले
आज माझ्याच देहा मी...
माझेच मरण मी डोळा पाहिले..!!
प्रीती तिवारी